साहित्य :
इटली रवा- २ कप, उडीद डाळ -अर्धा कप, मीठ- चवीनुसार, शिजवलेला भात- अर्धा कप, मसाल्यासाठी कांदे, टोमॅटो, आले, लसूण पेस्ट, घने, जिरेपूड, लाल तिखट, हळद, कोथिबीर, तेल, मीठ.
कृती
इटली रवा, उडीद डाळ ५ ते ६ तास भिजत ठेवा. त्यानंतर उडीद डाळ व भात अगदी बारीक वाटा. या मिश्रणात इडलीचा रवा, मीठ घालून पीठ आंबवण्यास ठेवा. नंतर नेहमीप्रमाणे इडल्या बनवा.
मसाला
इडलीच्या प्रमाणात कांदे घ्या. कांद्यापेक्षा निम्मे टोमॅटो घ्या. कांदा अडवा आणि पातळ चिरा. टोमॅटोचे बारीक तुकडे करा. पसरट भांड्यात तेल गरम करून त्यात कांदा घाला. सोनेरी रंगावर तळा; मग त्यात आले, लसूण, टोमॅटो घाला. मीठ घाला.
टोमॅटो नऊ झाल्यावर त्यात तिखट, धने, जिरेपूड, गरम मसाला घालून तेल सुटेपर्यंत परता. अर्धा कप पाणी घालून मसाला नीट लागला पाहिजे. झाकण ठेवून मंद आगीवर दणदणीत वाफ आणा. वाढताना वरून कोथिंबीर व शेव घाला.
पिकनिकला जाताना इडलीसोबत सांभार, चटणी न्यायला जमत नाही तेव्हा अशी मसाला इडली उत्तम ठरते.