Latest

Marathwada Cabinet Meeting | ‘आम्ही प्रकल्प रोखणारे नाही, तर…: मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर टीका

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : महायुती सरकारने आजपर्यंत सामान्यांसाठी निर्णय घेतले आहेत. आम्ही घोषणा करून कागदावर ठेवत नाही तर अंमलबजावणीही करतो. त्यामुळे आम्ही प्रकल्प रोखणारे नाही तर सुरू करणारे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ते कॅबिनेट बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (Marathwada Cabinet Meeting)

पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमच्या आत्तापर्यंतचे सर्व निर्णय घेतले. ते जनतेच्या विकासासाठी घेतले. महायुती सरकारने आजपर्यंत सामान्यांसाठी निर्णय घेतले. मराठवाड्याला न्याय देण्यासाठी ही बैठक घेण्यात आली असून, या बैठकीत जलसंपदा विभागाशी निगडीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचही शिंदे यांनी म्हटले आहे. (Marathwada Cabinet Meeting)

दुष्काळसद़ृश परिस्थिती, सिंचनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात तब्बल सात वर्षांनंतर आज शनिवारी (दि. १६) राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मराठवाड्याला ४५ हजार कोटी रूपये देण्याची घोषणा केली. दरम्यान १४ हजार कोटी रुपये हे नदी जोड प्रकल्पावर खर्च करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

आम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये नाही तर…मुख्यमंत्री शिंदेंचे विरोधकांना उत्तर

ही बैठक 'सर्वसामान्यांसाठी' नसून स्वतःच्या मौजेसाठी आणि प्रसिद्धीसाठीच असल्याचे म्हणावे लागेल, अशी विरोधकांकडून टीका करण्यात आली, या टीकेला उत्तर देताना, मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक होऊ नये, यासाठी विरोधकांकडून प्रयत्न करण्यात येत असून, आम्ही कोणत्याही 5 स्टार हॉटेलमध्ये थांबलेलो नसून, शासकीय सभागृहात थांबलो असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT