Latest

Marathi Web Series Simple Aahe Na : महाराष्ट्र दिनी मराठी ओटीटीवर पाहा ‘सिम्पल आहे ना?’ वेबसीरीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई म्हणजे मायानगरी… मुंबई कधीच झोपत नाही आणि हे अगदीच खरे आहे. याच जादुई दुनियेची रात्रीची सफर घडवणारा 'सिम्पल आहे ना?' ही धमाल वेबसीरीज प्लॅनेट ओटीटीवर लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या वेबसीरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून सिद्धार्थ खिरीद ,आयुषी भावे टिळक आणि सिद्धार्थ आखाडे प्रमुख भूमिकेत आहेत. (Marathi Web Series Simple Aahe Na) जेएमएफ मुव्हीज प्रस्तुत, डॉ. राजकुमार एम कोल्हे, डॉ. प्रेरणा राजकुमार कोल्हे निर्मित या वेबसिरीजचे दिग्दर्शन जान्हवी राजकुमार कोल्हे यांनी केले असून 'सिम्पल आहे ना?' चे लेखन सिद्धार्थ आखाडे यांचे आहे. ही वेबसीरीज येत्या १ मे रोजी प्रदर्शित होईल. (Marathi Web Series Simple Aahe Na)

ट्रेलरमध्ये दोन अनोळखी व्यक्तींची शेवटची ट्रेन मिस झाल्याचे दिसत असून इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी झालेली त्यांची रोलरकोस्टर राईड यात पाहायला मिळणार आहे. त्यांचा हा रात्रीचा प्रवास त्यांना कुठे घेऊन जाणार हे वेबसीरीज पाहिल्यावरच कळेल.

दिग्दर्शिका जान्हवी राजकुमार कोल्हे म्हणतात, "ही एक मजेशीर वेबसीरीज आहे. जो संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र पाहाता येईल. शेवटची ट्रेन सुटल्यानंतर दोन वेगळ्या दिशेला राहाणारे प्रवासी जेव्हा एकत्र येतात. तेव्हा काय तारांबळ उडते. विषय खूपच सिम्पल आहे, परंतु अनोख्या पद्धतीने तो यात मांडण्यात आला आहे. वेबसीरीज नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होईल."

SCROLL FOR NEXT