Latest

Mrunal Thakur : wow…; मृणालचा मॅटॅलिक-सिल्व्हर गाऊन अन् हॉट अदा ( video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री मृणाल ठाकूर ( Mrunal Thakur ) तिच्या वैयक्तीक जीवनासोबत नवनविन हटके लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या मृणालचा ब्लॅक रंगाच्या साडीतील एकदम परफेक्ट लूक समोर आला आहे. दरम्यान नुकत्याच काल पार पाडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेटवरही ती झळकली. दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केलाय.

अभिनेत्री मृणाल ठाकूर तिच्या अप्रतिम अभिनयासोबत निखल सौंदर्यासाठी ओळखली जाते. नुकतेच मृणालने तिच्या इन्स्टाग्रामवर ब्लॅक रंगाच्या साडीतील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती समुद्राच्या किनाऱ्यावर शूट करताना दिसत आहे. याशिवाय तिच्या हातातील एका छोट्या पर्सनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलंय. दरम्यान समुद्राच्या किनाऱ्यावर अनेक पर्यटक आणि शूटिंग घेणाऱ्या व्यक्तीही दिसत आहेत. हिरवा निर्सग, नारळाची झाडे, रेस्टॉरंट, मेकअप आर्टिस्ट, निखळ समुद्राचे पाणी, लाकडी झोका आणि आजूबाजूची वाळू या सर्व गोष्टी दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक करताना कॉमेन्टस केल्या आहेत.

दरम्यान काल पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मृणालने हजेरी लावत रेड कार्पेटवर झळकली. यावेळी तिने लव्हेडर कलरचा मॅटॅलिक-सिल्व्हर गाऊन परिधान केलाय. यावेळी ती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. मोकळ्या केसांची स्टाईल, कानात छोटे इअररिग्स, हातात अंगठी, हाय हिल्स आणि मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला होता. हा व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरही चाहत्यांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडलाय.

'Most beautiful girl in the industry ??', 'Woha ? transformation look ?', 'Beautiful ❤️', 'yashna and her black saree look', 'Crush ❤️', 'Steaming?', 'I Love You Muu ?❤️❤️', 'Rose's ❤️‍?', 'the saree,your hair and that nose ring everything is so perfect. ?', 'Absolutely Stunning & Gorgeous Queen❤️?', 'So Cute ! ♥️', 'Awwwww❤️', 'Black colour wow?', यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. ब्लॅक साडीतील व्हिडिओला आतापर्यत १४ लाख ५७ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. तर फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील व्हिडिओला ३३ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

(video : viralbhayani instagram वरून साभार)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT