Latest

Maratha Reservation : कुणबी खोडून लिहिले मराठा ; महसूलच्या दप्तरी खाडाखोड

अमृता चौगुले

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना आणि महसूल दप्तरी कुणबी नोंदींची तपासणी सुरू असताना तालुक्यातील कारेगाव येथील एका दाखल्यावर चक्क 'कुणबी' ही मूळ नोंद पेनने खोडून 'मराठा' असे लिहिल्याचे संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या कागदावर दिसत असल्याची तक्रार अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी केली आहे. महसूल विभागानेच संबंधित नोंदी वेबसाईटवर प्रसिद्ध केल्याचे सांगून पटारे म्हणाले, की कुणबी नोंदी असलेली कागदपत्रे शोधून संकेतस्थळावर अपलोड करण्यास राज्य शासनाने सांगितले आहे. त्यानुसार तालुक्यातील कागदपत्रेही अधिकार्‍यांकडून अपलोड केली जात आहेत. त्यातच कारेगाव येथील एका कागदावर 'यादव बाळा तर्‍हाळ' या नावापुढे लिहिलेली 'कुणबी' नोंद पेनाने खोडली आहे आणि त्याखाली 'मराठा' लिहिले आहे.

याबाबत अ‍ॅड. सुभाष जंगले, शरद बोंबले, भरत पटारे, बाबा भांड, भाऊसाहेब तर्‍हाळ यांच्यासह जाऊन तहसीलदार आणि प्रांताधिकार्‍यांकडे विचारणा केल्याचे; मात्र त्यांनाही याबाबत खुलासा करता न आल्याचे पटारे यांनी सांगितले. मात्र या पुराव्याची सत्यप्रत मागवून त्यावर कोणी खाडाखोड केली, हे तपासले जाईल, असे प्रांताधिकार्‍यांनी सांगितल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT