Latest

Maratha Reservation : मनोज जरांगे-पाटील आजपासून राज्यव्यापी दौऱ्यावर

स्वालिया न. शिकलगार

वडीगोद्री – पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे-पाटील आजपासून तिसऱ्या टप्प्यातील राज्यव्यापी दौरा करत आहे. (Maratha Reservation ) यामध्ये धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, पुणे, पालघर, ठाणे, कल्याण, नाशिक, नगर, बीड आदी १३ जिल्ह्यांच्या दौऱ्यासाठी अंतरवाली सराटीतून ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन ते ४० वाहनांच्या ताफ्यासह रवाना झाले. (Maratha Reservation ) आजपासून १५ ते २३ नोव्हेंबर दरम्यान ९ दिवसाचा हा दौरा असणार आहे. दौऱ्यावर निघण्याअगोदर अंतरवाली सराटी गावातील मारुतीचे मंदिर, लक्ष्मी मातेच्या मंदिरात दर्शन घेतले.

हा राज्यव्यापी दौरा ९ दिवसांचा असून दौऱ्यात १३ ‎जिल्ह्यांतील २८ ठिकाणी जरांगे पाटील मराठा समाजाशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी ते २ हजार किलोमीटरहून‎ अधिक प्रवास करणार आहेत. तसेच या दौऱ्यात जरांगे पाटील यांच्यासोबत कायम २०० कार्यकर्ते आणि ४० वाहनांचा ताफा सोबत आहे.

आज दौऱ्यातील पहिली सभा धाराशिव जिल्ह्यातील वाशी या ठिकाणी होणार असून नंतर सोलापूर जिल्ह्यात आजच्या दोन सभा होणार आहेत. या दौऱ्या दरम्यान ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरील समाधीला अभिवादन करणार आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथील संभाजी महाराज यांच्या समाधीचेही ते दर्शन घेऊन अभिवादन करणार आहेत.

SCROLL FOR NEXT