Latest

ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणारच! चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावले उचलली आहेत. त्यामुळे कुणाचेही आरक्षण कमी होणार नाही, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. मराठा आरक्षणासाठी आंदोलनावर असणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री त्यांचे उपोषण सोडण्यासाठी गेले, ते सरकारचे सर्वोच्च नेते आहेत, त्यामुळे दुसरे कोण गेले किवा नाही याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्वपक्षीय बैठकीत जी भूमिका महायुती सरकारने मान्य केली होती. त्यानुसारच आरक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजात भीती असू नये.

40 वर्षे शरद पवार यांना ते जमलेच नाही

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदा करून न्याय देण्याचा प्रयत्न केला. ४० वर्षे सत्तेत राहून शरद पवारांना आरक्षण देणे जमले नव्हते. त्यामुळे शरद पवारांनी किमान मराठा आरक्षणावर आता बोलू नये अशी टिका केली. सुप्रिया सुळे यांनीही इतिहास तपासून पहावा, अशी कोपरखळीही त्यांनी लागवली. दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीवर बोलताना ते म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कायद्याच्या चाकोरीतच योग्य तो निकाल देतील असा विश्वास आहे.

SCROLL FOR NEXT