Latest

Maratha Aarakshan | १४ फेब्रुवारी महाराष्ट्र बंद.. मनमाडमध्ये शुकशुकाट

अंजली राऊत

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या मनमाड बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

मराठा आरक्षणासाठी काढण्यात राज्य शासनाने तर्फे काढण्यात आलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे. या मागणी सोबत मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे बुधवार, दि.14 आजपासून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मनमाड शहरापासून उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून संपूर्ण शहर शंभर टक्के कडकडीत बंद ठेवण्यात मनमाडकरांनी पाठींबा दिल्याचे दिसून येत आहे. शहरातील सर्वच रस्त्यावर शुकशुकाट पसरला असून महाराष्ट्र बंद मधून मेडिकल, हॉस्पिटल यासह इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT