Latest

१ सप्टेंबरपासून काय काय बदलणार?

मोहन कारंडे

वित्तीय क्षेत्राशी संबंधित अनेक नियमांत 1 सप्टेंबरपासून बदल होणार आहेत. कोणत्या क्षेत्रात बदल होणार आहेत, याची नागरिकांना माहिती होणे आवश्यक आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार 2 हजारांच्या नोटा बदलण्याची अखेरची तारीख 30 ऑगस्ट आहे. बँकेतून या नोटांची देवाणघेवाण बंद होणार आहे.

घरगुती गॅस सिलिंडर 1 सप्टेंबरपासून दोनशे रुपयांनी स्वस्तात मिळतील. उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना 400 रुपयांपर्यंत सवलत मिळणार आहे.

विनाशुल्कात आधार अपडेट करण्यासाठी 14 जून ही अंतिम तारीख होती. ही मुदत 14 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

डिमॅट खात्याच्या नॉमिनेशनच्या प्रक्रियेची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. या कालावधीत नॉमिनेशन न केल्यास डिमॅट खाते बंद होणार आहे.

काही बँकांच्या क्रेडिट कार्डच्या नियम आणि अटींत बदल होणार आहे. क्रेडिट कार्डवर दिल्या जाणार्‍या सवलती बंद होणार असून जीएसटीच्या शुल्कातही बदल करण्यात आला आहे.

पॅन-आधार लिकिंगसाठी अखेरची मुदत 30 सप्टेंबर आहे. या कालावधीत लिकिंग न झाल्यास पॅन निष्क्रिय होणार आहे. त्याचा डिमॅट अकाऊंटवरही परिणाम होणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआयने वुई केअर योजना सुरू केली असून या योजनेची अंतिम मुदत 30 सप्टेंबर आहे. या योजनेंतर्गत गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.5 टक्के व्याज मिळणार आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात पेट्रोलियम कंपन्यांकडून ग्राहकांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीचा आढावाही प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या तारखेला घेण्यात येणार आहे. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून सीएनजी-पीएनजीच्या किमतीमध्ये बदल होणार आहेत.

SCROLL FOR NEXT