Latest

बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक सर्वांचे स्फूर्तीस्थान ठरेल : उद्धव ठाकरे

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे आतापर्यंत ५८ टक्के काम झाले आहे. २०२३ अखेरपर्यंत काम पूर्ण होईल, असे सांगून या स्मारकाबद्दल अनेकांच्या मनात कुतुहूल आहे. हे स्मारक सर्वांचे स्फूर्तीस्थान ठरेल, असा विश्‍वास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि.५) येथे व्यक्त केला. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी मंत्री आदित्य ठाकरे, सुभाष देसाई उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेबांच्या स्मारकाच्या माध्यमातून बाळासाहेबांची जुनी भाषणे, व्यंगचित्रे, मार्मिकमधील विशेष व्यंगचित्रे यांचे सादरीकरण कऱण्यात येणार आहे. त्यामुळे स्मारक बघण्यासाठी येणाऱ्यांना स्फूर्ती मिळेल. स्मारक पाहिल्यानंतर संकटांवर मात करण्याची प्रेरणा मिळेल. बाळासाहेबांची जुनी भाषणे, आठवणी, मते, मुलाखती, फोटो, व्हिडिओ मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. बाळासाहेबांनी आय़ुष्यभर जे काम केले, ते मांडण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ठाकरे म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंचे भाषण जनतेला जागृत करणारी होती. त्यामुळे स्मारकात त्यांची भाषणे, मार्मिकमधील व्यंगचित्रे पाहता येणार आहेत. त्यासाठी मार्मिकचा अंक, भाषणे मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्मारकाचे भूमिगत बांधकाम सुरू आहे. त्यामुळे वेळ लागत आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक जिवंत अनुभव देईल, लँडस्केपमधूनही बाळासाहेब दिसतील, परंतु स्मारकात फक्त शिवसेनेच मुख्यमंत्री दिसतील, शिवसेना सोडून गेलेल्यांना कोणचेच स्थान नसेल, असा टोला ठाकरे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावेळी लगावला.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT