छत्रपती संभाजीनगर ः पुढारी वृत्तसेवा : महायुती आणि महाविकास आघाडी एकच आहे. माझ्या या वाक्याचा गैरअर्थ लावून मराठा समाजात संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. मात्र आघाडी व युती या दोघांनी मराठा समाजाचे वाटोळे केले, असा माझा बोलण्याचा उद्देश होता. गेल्या दोन महिन्यांपासून मी हेच बोलत असल्याचे सांगत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी स्पष्टीकरण दिले. गुरुवारीफिेसबुक लाईव्ह माध्यमातून त्यांनी संवाद साधला.
मनोज जरांगे उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात भरती आहेत. जरांगे म्हणाले, माझा राजकीय मार्ग नाही. त्यामुळे कोणाला उभे केले नाही आणि कोणाला पाठिंबाही दिला नाही. मी फक्त समाजाला प्रामाणिकपणे सांगितले आहे जे सगेसोयर्याची अंमलबजावणी आणि कुणबी व मराठा बाजूने उभे राहतील त्यांनाच सहकार्य करा. मग तुम्ही कोणालाही मतदान करा, मात्र ज्याने समाजाचा विरोध केला त्याचा असा दारुण पराभव करा की त्याला समाजाची ताकद दिसली पाहिजे, असे जरांगे म्हणाले. मी निवडणूक समाजाच्या भरवश्यावर सोडली आहे. संभ्रम पसरावीत आहेत त्यांना उद्या मराठ्यांच्या दारात यायचे आहे हे लक्षात ठेवावे, असेही ते म्हणाले.
जरांगे म्हणाले, समाजाला ज्याने विरोध केला त्याच्या पराभवात समाजाचा मोठा विजय आहे. स्पष्ट सांगतो मी कुणालाही उभे केले नाही. मात्र येणार्या विधानसभेत या सगळयांना मराठा समाजाची ताकद दाखवून देईल.