Latest

Mann Ki Baat : ‘मन की बात’साठी देशवासियांनी आत्मियता आणि आपुलकी दाखवली- पीएम मोदी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: 'मन की बात' या कार्यक्रमाचा आजचा भाग हा दुसऱ्या शतकाची सुरूवात आहे. गेल्या महिन्यात मन की बात या कार्यक्रमाचा १०० वा भाग धुमधाममध्ये साजरा करण्यात आला. देशातील देसवासियांचा या कार्यक्रमातील सहभाग हा मन की बात ची सर्वात मोठी ताकद आहे. 'मन की बात'साठी तुम्ही सर्वांनी दाखवलेली आत्मीयता आणि आपुलकी अभूतपूर्व आहे, ती हृदयस्पर्शी आहे, असे देखील मोदी यांनी स्पष्ट केले. १०० व्या ऐतिहासिक 'मन की बात' च्या प्रसारानंतर ते आज पुन्हा 'मन की बात' कार्यक्रमाच्या १०१ व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज (दि.२८) देशवासियांशी संवाद साधला.

जेव्हा 'मन की बात'चा १०० वा भाग प्रसारित झाला, तेव्हा जगातील विविध देशांमध्ये, वेगवेगळ्या टाइम झोनमध्ये, कुठे संध्याकाळी तर कुठे रात्री मोठ्या संख्येने लोकांनी 100 वा भाग पाहिला. 'मन की बात'वर देश-विदेशातील लोकांनी आपली मते मांडली आहेत.
आजच्या १०१ व्या मन की बात कार्यक्रमाच्या प्रसारणादरम्यान पीएम मोदी यांनी देशातील दोन युवकांशी संवाद साधला. यामध्ये अरुणाचल प्रदेशच्या ग्यामर न्योकुम या युवकाशी तर बिहारमधील विशाखा सिंह या युवतीशी त्यांनी संवाद साधला. या दोघा युवकांची वैयक्तिक माहिती जाणून घेतली.

'युवा संगम' युवकासाठी एक अद्भुत उपक्रम – पीएम नरेंद्र मोदी

'एक भारत, श्रेष्ठ भारत' या भावनेला बळ देण्यासाठी भारतात आणखी एक अनोखा प्रयत्न करण्यात आला तो म्हणजे 'युवा संगम' कार्यक्रम आहे. आपल्या देशात पाहण्यासारखे खूप काही आहे. हे लक्षात घेऊन शिक्षण मंत्रालयाने 'युवासंगम' नावाचा एक अद्भुत उपक्रम हाती घेतला आहे, असे म्हणत पीएम मोदी यांनी या उपक्रमांचे कौतुक केले आहे. युवा संगमच्या पहिल्या फेरीत देशातील सुमारे १२०० तरुणांनी देशातील २२ राज्यांचा दौरा केला. यामधील सहभागी प्रत्येकजण या उपक्रमांचा भाग झाला आहे. या दौऱ्यातील अनेक आठवणी घेऊन युवक परत येत आहेत, ज्या आयुष्यभर त्यांच्या हृदयात कोरल्या जातील, असेही पीएम मोदी यांनी स्पष्ट केले आहे.

देशातील प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवरांची निर्मिती

आपण सर्वांनी एक म्हण अनेक वेळा ऐकली असेल, पुन्हा पुन्हा ऐकली असेल 'पाण्याशिवाय सर्व काही व्यर्थ आहे'. पाण्याशिवाय जीवनावर नेहमीच संकट येते, व्यक्ती आणि देशाचा विकासही ठप्प होतो. भविष्यातील हे आव्हान लक्षात घेऊन आज देशातील प्रत्येक जिल्ह्यात ७५ अमृत सरोवरांची निर्मिती केली जात असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले आहे.

पाहा व्हिडिओ: 'मन की बात' कार्यक्रमाचा १०१ वा भाग

SCROLL FOR NEXT