Latest

Manish Sisodia : सीबीआय चौकशी दरम्यान केजरीवालांचे सिसोदियांसाठी भावनिक ट्विट

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी सीबीआय आज (दि.२६) दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची चौकशी करत आहे. दरम्यान, सीबीआय मुख्यालयात जाण्यापूर्वी मनीष सिसोदिया यांनी राजघाटावर पोहोचत महात्मा गांधींचे आशीर्वाद घेतले. यानंतर आपचे प्रमुख नेते, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिसोदियांना उद्देशून भावनिक ट्विट करत आधार दिला.

अरविंद केजरीवाल यांनी सिसोदियांनी सीबीआय चौकशीपूर्वी केलेल्या ट्विटला उत्तर देताना म्हटले आहे, "मनीष देव तुमच्या पाठीशी आहे. लाखो मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या प्रार्थना तुमच्यासोबत आहेत. जेव्हा तुम्ही देशासाठी आणि समाजासाठी तुरुंगात जाता, तेव्हा तुरुंगात जाणे ही वाईट गोष्ट नाही, तो एक आशीर्वाद आहे. मी प्रार्थना करतो की, तुरुंगातून तुम्ही लवकर परत या. दिल्लीतील मुले, पालक आणि आम्ही सर्वजण तुमची वाट पाहत आहोत.

देशाची प्रगती कशी होणार?- अरविंद केजरीवाल

पुढे अरविंद केजरीवाल यांनी आणखी एक ट्विट केले आहे त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे ती,  ज्या देशात गरीब मुलांना चांगले शिक्षण देणारे आणि त्या मुलांचे भविष्य घडवणारे तुरुंगात आहेत. तर दुसरीकडे कोट्यवधींचा घोटाळा करणारे पंतप्रधानांचे जवळचे मित्र आहेत, त्या देशाची प्रगती कशी होणार? असा प्रश्न सरकारला केला आहे. तसेच मनीष काळजी करू नका, आम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेऊ; असे आश्वासन देखील केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांना दिले आहे.

मी भगतसिंगाचा अनुयायी- सिसोदिया

आज पुन्हा सीबीआयकडे जात आहे. संपूर्ण तपासात पूर्ण सहकार्य करेन. लाखो मुलांचे प्रेम आणि करोडो देशवासीयांचे आशीर्वाद माझ्या सोबत आहे. काही महिने तुरुंगात सुद्धा राहावे लागेल तरी मला पर्वा नाही. मी भगतसिंगाचा अनुयायी आहे. देशासाठी भगतसिंग यांनी प्राणाची आहुती दिली. अशा खोट्या आरोपांमुळे तुरुंगात जाणे ही तर छोटी गोष्ट असल्याचेही दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT