Latest

सोलापूर : मंगळवेढा शहरात शस्त्र घेऊन फिरणाऱ्या तरुणावर पोलिसांची कारवाई

अमृता चौगुले

मंगळवेढा; पुढारी वृत्तसेवा : मंगळवेढा शहरातील मार्केट यार्डात अवैधरीत्या लोखंडी कोयता व सुरी बाळगणाऱ्या विशाल उर्फ भैय्या अरुण हजारे (वय २२ वर्ष रा. हजारे गल्ली मंगळवेढा) या युवकास मंगळवेढा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडील शस्त्र जप्त केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 18 रोजी ते दिनांक 19 दरम्यान अमावस्या असलेने पोलिसांकडून पहाटे ५ वाजे पर्यंत ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात आले होते. दरम्यान मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात आरोपी चेक करणे, अवैद्य अग्निशस्त्रे बाळगणारे इसमाचा शोध घेण्याकरिता पेट्रोलिंग करत असताना मंगळवेढा शहरातील मंगळवेढा मार्केट यार्ड मधील मोकळ्या जागेत लिंबाच्या झाडाच्या आडोशाला एक इसम आढळून आला. पोलिसांनी सदर इसमास ताब्यात घेवून त्याचे जवळील एक लोखंडी कोयता व लाकडी मुठ असलेली सुरी जप्त करून त्यास अटक केली. त्याचे नाव विशाल उर्फ भैय्या अरुण हजारे (वय २२, रा. हजारे गल्ली, मंगळवेढा) असे आहे. त्याच्या विरोधात मंगळवेढा पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, सोलापुर ग्रामीण, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमतराव जाधव, श्रीमती राजश्री पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने पो.हे.काँ दयानंद हेबांडे, पोहेकॉ हजरत पठाण, पोकों अजित मिसाळ, पोकों सुरज देशमुख यांनी सदर गुन्ह्याचे तपास कामी मदत केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास मंगळवेढा पोलीस ठाणे हे करीत आहेत.

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT