Latest

पुणे : यवतच्या पालखी तळावर खून

अमृता चौगुले

यवत, पुढारी वृत्तसेवा : यवत (ता.दौंड)गावात गजबजलेल्या ठिकाणी एका व्यक्तीचा खून झाल्याने यवत परिसरात खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता हा प्रकार उघडकीस आला आहे.

यवत मधील पालखी तळावरील शेडमध्ये एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा दिसून आला. त्याच्या पोटात धारधार शस्त्राने वार केल्याचे दिसत होते. या घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास यंत्रणा वापरत या व्यक्तीचे ओळख पटवण्यात यश मिळवले आहे. सबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव संजय सखाराम बनकर असे असून, तो सोलापुर शहरातील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे. यवत मधील लोकवस्तीत हा प्रकार घडला असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सबंधित व्यक्तीचे नातेवाईक खामगाव तांबेवाडी येथे राहत असून हा खुन नेमका कोणत्या कारणामुळे घडला आहे. याचा तपास यवत पोलीस करत आहेत. घटनास्थळी यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पद्मराज गम्फले, सुजित जगताप यांनी भेट दिली असुन तपास सुरु आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम दुपार पर्यंत सुरु होते.

SCROLL FOR NEXT