Latest

Man killed by Robot : रोबोटने केला माणसाचा ‘खून’!

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्याच्या आधुनिकतेच्या जगतात मानवाने रोबोटला सर्व प्रकारची कामे करण्यासा सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला आहे. रोबोटकडून मानव अनेक कामे करुन देखील घेतो. मात्र, काही वेळेस याचे विचित्र परिणाम देखील पहायला मिळतात. दक्षिण कोरियामध्ये एका रोबोटने एका माणसाचा जीव घेतला आहे. रोबोट काम करताना बॉक्स आणि माणसामध्ये फरक समजू शकला नाही. त्याने बॉक्स समजून कर्मचाऱ्याला उचलून कन्व्हेयर बेल्टवर फेकले. रोबोटिक कंपनीचा कर्मचारी रोबोट तपासण्यासाठी आला असता ही घटना घडली. (Man killed by Robot)

दक्षिण कोरियाची वृत्तसंस्था योनहापने दिलेल्या माहितीनुसार, रोबोटने त्या माणसाला बॉक्स समजले, त्यानंतर रोबोटने त्याला उचलून फेकून दिले. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून सुरक्षा व्यवस्थापकावरही कारवाई होऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, याआधीही एक व्यक्ती ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये अडकून जखमी झाला होता, त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. (Man killed by Robot)

नुकताच श्वास घेणारा रोबोट तयार करण्यात आला (Man killed by Robot)

नुकताच श्वास घेणारा रोबोट तयार करण्यात आला. हा एक रोबोट आहे जो तुम्हाला घाम देखील काढतो. याला बनवणाऱ्या कंपनीने त्याला 'स्वेटी रोबोट' असे नाव दिले आहे. अनेक रोबोंच्या मदतीने हा रोबो बनवण्यात आला आहे. या थर्मल रोबोटमध्ये अशी वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत. ज्यामुळे तो थेट मानवांशी स्पर्धा करू लागला आहे. या रोबोटला घामही येतो आणि थंडीही वाटते. या रोबोच्या प्रकल्पाचे नेतृत्व करणाऱ्या कोनराड रेक्झेव्स्की यांनी सांगितले की, अँडी रोबोला घाम फुटेल आणि थंडीही जाणवेल. ज्यामुळे तो थरथर कापेल. फर्मने घामाघूम बाळंही बनवली आहेत. हे बेबी रोबोट्स मुलांच्या आरोग्याची स्थिती समजून घेण्यास मदत करतील. (Man killed by Robot)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT