Latest

आदित्‍य ठाकरेंना धमकी देणार्‍याला अटक, मुंबई पोलिसांची बंगळूरमध्‍ये कारवाई

नंदू लटके

बंगळूर : पुढारी ऑनलाईन

मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र, मंत्री आदित्‍य ठाकरे यांना धमकी देणार्‍याला आज अटक करण्‍यात आली. मुंबई गुन्‍हे अन्‍वेषण विभागाने संशयित आरोपीला बंगळूर येथे अटक केली आहे.

८ डिसेंबर रोजी आदित्‍य ठाकरे यांना जयसिंह राजपूत नावाने फोन आला. या व्‍यक्‍तीने आदित्‍य यांना फोनवरुन धमकी दिली. यावेळी त्‍याने आपण दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा चाहता असल्‍याचेही यावेळी सांगितले होते. आदित्‍य ठाकरे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. यानुसार पोलिसांनी बंगळूरमध्‍ये जावून संशयित आरोपीला अटक केल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.

SCROLL FOR NEXT