Latest

पुणे: बदनामीची भीती दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलगी गरोदर राहिल्याने अत्याचाराचे बिंग फुटले

अमृता चौगुले

भिगवण/शेटफळगढे (पुणे), पुढारी वृत्तसेवा: भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीला बदनामीची भिती घालत दोन नराधमांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलगी गरोदर राहिल्याने अत्याचाराचे बिंग फुटले. यावरून शेटफळगढेच्या माजी महिला उपसरपंचाचा पती व एका वीटभट्टी मालकासह दोघा जणांवर 'पोस्को' व 'ॲट्रॉसिटी' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून एकास अटक करण्यात आली आहे.

जानेवारी २०२३ या कालावधीत संबंधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला.अर्जुन उर्फ अजित रामभाऊ कुंभार (वय ४५ ) व रमेश रघुनाथ मोरे (वय ३५ दोघे रा. शेटफळगढे ता. इंदापुर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिढीत मुलगी १४ वर्ष ११ महिन्यांची व अनुसूचित जाती जमातीची आहे. हे माहीत असताना देखील तिच्या अज्ञानाचा फायदा घेत "जर माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित नाही केले, तर तुझ्या वडिलांकडे तुझ्याविषयी मित्रांसोबत प्रेमसंबंध आहेत, अशी खोटी बदनामी करीन" अशी धमकी देत कुंभार याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तर मोरे यांनी "तुझे व वीटभट्टी मालकाचे संबंध असल्याची बदनामी करीन. माझ्याशीही संबंध प्रस्थापित कर" अशी धमकी देऊन या दोघांनी वेळोवेळी त्या मुलीवर अत्याचार केले. दरम्यान मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करता ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. यावरून तिच्या आईने भिगवण पोलिसात रितसर फिर्याद दाखल केली आहे. यातील मोरे यास पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे करीत आहेत.

SCROLL FOR NEXT