Latest

दुपारी तू माझी आई, बहीण का काढलीस? माझ्याशी का भांडलीस? म्हणत पतीने आळवला पत्नीचा गळा

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: दारूच्या नशेत पत्नीच्या गळ्यात दोरी आवळून तिचा गळा आवळला. त्यानंतर पोटात, पाठीवर चाकूने सपासप वार करून तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि.19) रात्री सव्वाअकरा वाजता वारजे येथील विठ्ठलनगर परिसरात घडली.

सुदैवाने पत्नीने आरडाओरडा केल्याने मुलाने दरवाजा उघडला व चाळीतील लोकांनी धाव घेतल्याने महिलेचा जीव वाचला. पत्नीची परिस्थिती गंभीर असून, त्यांच्यार सध्या ससून रुग्णलयात उपचार सुरू असल्याचे पोलिसानी सांगितले. प्रियांका हेमंत सोनावणे (वय 26, रा. विठ्ठलनगर लेन क्रमांक ३) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी प्रियांका यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वारजे पोलिसांनी दारूडा पती हेमंत मधुकर सोनवणे (वय 37, रा. विठ्ठलनगर, वारजे) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पती व दोन मुलांसह वारजे येथे राहतात. पती-पत्नीत घरातील किरकोळ कारणावरून वाद होत होते. आजारी असल्याने गुरुवारी रात्री फिर्यादी या झोपून होत्या. हेमंत घरीच होता. रात्री तो बाहेर गेला. येताना दारूची बाटली, एक चाकू व प्लास्टिकची दोरी त्याने खिशात लपवून आणली. तो घरातच दारू प्यायला. त्यानंतर तो फिर्यादीला म्हणाला, दुपारी तू माझी आई, बहीण का काढलीस व माझ्याशी का भांडलीस, असे म्हणत रागाच्या भरात त्याने फिर्यादीच्या गळ्याला पूर्णपणे दोरी गुंडाळली व दोरी आवळू लागला. फिर्यादीने त्याला विरोध केला असता त्याने आणखी दोरी आवळली. तेव्हा त्यांच्या गळ्याला कापले व त्यातून रक्त येऊ लागले. तेवढ्यात ती दोरी तुटल्याने फिर्यादी त्याला आणखी विरोध करू लागल्या. त्याने चाकू काढला व फिर्यादीला धमकावत फिर्यादींच्या पोटात ठिकठिकाणी सपासप भोसकले. त्यांनी आरडाओरडा सुरू केला. तेव्हा त्यांची दोन्ही मुलेही आरडाओरडा करू लागली. मोठ्या मुलाने घराचा दरवाजा उघडला. त्यांचा आरडाओरडा ऐकून चाळीतील लोक जमा झाले. तोवर त्याने फिर्यादीच्या पाठीत आणखी एक वार केला. तेव्हा लोकांनी त्याला पकडले. फिर्यादी यांना ससून रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी पती हेमंत सोनवणे याला अटक केली आहे.

SCROLL FOR NEXT