Latest

मलकापूर : दुचाकी घसरून अपघातात पाचवर्षीय बालकाचा मृत्यू

backup backup

मलकापूर : पुढारी वृत्तसेवा

मलकापूर-कोकरूड मार्गावरील पेरीड गावच्या हद्दीत मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात आर्यन महेश उरुणकर (वय 5) या बालकाचा मृत्यू झाला. त्याची आई माधवी महेश उरुणकर (वय 27, रा. जावडेकर चौक इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) व नातेवाईक राज गणेश पवार (वय 15) हे दोघेजण गंभीर जखमी झाले. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी तीन वाजता घडला.

माधवी उरुणकर या आपला मुलगा आर्यन व नातेवाईक राज पवारबरोबर येळवण जुगाईला मोटारसायकलीवरून देवदर्शनासाठी निघाले होते. पेरीड गावच्या हद्दीत त्यांची मोटारसायकल घसरली. यात गाडीवर बसलेल्या आर्यनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने उपचारासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तो मृत झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गंभीर जखमी माधवी उरुणकर व राज पवार यांच्यावर प्राथमिक उपचार ग्रामीण रूग्णालयात करून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय दाखल करण्यात आले आहे. मृत आर्यनचे मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघाताचा अधिक तपास पो. नि. विजय पाटील व महिला काँ .बी बी यादव हे करीत आहेत. अपघातातील पाच वर्षीय आर्यनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याच्या नातेवाईकांसह परिसरातून हळहळ व्यक्त होत होती. सकाळी हसत चेहर्‍याने आलेल्या आर्यनला दुपारी मृत्यूने कवटाळले.

SCROLL FOR NEXT