Latest

Kuttey Movie : कुत्ते पाहून मलायकाने केलं अर्जुनचं ढिगभर कौतुक, म्हणाली…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्जुन कपूर (Arjun Kapoor), राधिका मदान (Radhika Madan) आणि तब्बू (Tabbu) यांचा चित्रपट 'कुत्ते' (Kuttey Movie) आज थिएटरमध्ये रिलीज झाला. चित्रपटाच्या रिलीज आधी गुरुवारी 'कुत्ते'चित्रपटाची स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. अर्जुन कपूरचा हा चित्रपट बॉलिवूड सेलिब्रिटींनीही पाहिला. यामध्ये मलायका अरोरादेखील मागे व्हती. ती तर अर्जुनचे कौतुक करत थकत नाहीये. अर्जुनची लेडी लव्ह मलायका अरोराने चित्रपट पाहिल्यानंतर रिव्ह्यूदेखील दिला आहे. त्याचसोबत तिने सोशल मीडियावर फॅन्सना हा चित्रपट पाहण्याची विनंतीदेखील केली आहे. (Kuttey Movie)

मलायका अरोराने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. मलायका लिहिते की, "व्वा, काय धमाकेदार चित्रपट आहे. सर्व कलाकारांनी जबदस्त परफॉर्मन्स दिले आहे." या अभिनेत्रीने 'लेट्स गो टू मूवी' स्टीकरसोबत पोस्टर शेअर करून सर्व फॅन्सना चित्रपट पाहण्याची विनंती केली आहे.

कौतुक कुणाला आवडत नाही. आणि जेव्हा स्वत: गर्लफ्रेंड बोलत असेल तेव्हा तर 'बात ही कुछ और है'. मलायकाकडून आपले कौतुक ऐकून अर्जुन कपूरला इतका आनंद झाला की, त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मलायकाच्या प्रतिक्रियाची पोस्ट शेअर केली आहे. अर्जुनने मलायकाला आपली सर्वात मोठी चीयर लीडर म्हटलं आहे.

बॉलीवूड स्टार्सना आवडला 'कुत्ते'

चित्रपट 'कुत्ते' प्रसिद्ध दिग्दर्शक आणि संगीतकार विशाल भारद्वाज आणि रेखा भारद्वाज यांचा मुलगा आसमान भारद्वाजने दिग्दर्शित केला आहे. त्याने या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात डेब्यू केला आहे. या चित्रपटाचे म्युझिक विशाल भारद्वाज यांनी दिलं आहे. मल्टीस्टारर या चित्रपटाला बॉलीवूडच्या दिग्गजांनी पसंती दिलीय. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT