Latest

Mahua Moitra : महुआ मोईत्रांना प्रश्नांच्या बदल्यात मौल्यवान भेटवस्तू दिल्या : दर्शन हिरानंदानी

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालच्या कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी लाच घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याप्रकरणी गुरुवारी मोठा खुलासा झाला. महुआ यांच्यावरील आरोप खरे असल्याचे उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांनी स्वत: प्रतिज्ञापत्रात कबूल केले आहे. दर्शन हिरानंदानी यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात असा दावा केला आहे की महुआ मोईत्रा यांनी दर्शन हिरानंदानी यांना लॉगिन आणि पासवर्ड दिला होता ज्यानंतर त्यांनी महुआ यांच्या संसदेच्या अकाऊंटवर प्रश्न अपलोड केले होते. (Mahua Moitra) महुआ मोइत्रा यांनी त्यांच्या खासदार म्हणून त्यांचे संसदेतील अकाऊंटचे लॉग-इन आणि पासवर्ड शेअर केला होता.

महुआ यांना मी महागड्या भेटवस्तू दिल्या : दर्शन हिरानंदानी

दर्शन हिरानंदानी यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, अदानी समूहाला टार्गेट करण्यासाठी मी प्रश्न पाठवले होते, असे दर्शन हिरानंदानीच्या वतीने सांगण्यात आले आहे.  मी महुआ यांच्या संसद अकाऊंटवर प्रश्न पोस्ट करत राहिलो. त्या बदल्यात मी महुआ यांना महागड्या भेटवस्तू दिल्या. महुआ यांच्या सहलीचा आणि सुट्ट्यांचा खर्च मी उचलायचो. त्याचबरोबर महुआ याचे सरकारी घर मी दुरुस्त करून घेतले.  महुआ मोइत्रा यांना पाठिंबा दिल्याने मला विरोधी पक्षांची मदत मिळेल.

महुआ मोईत्रा यांना राजकारणात वेगाने प्रगती हवी होती

पंतप्रधान मोदींना टार्गेट करण्यासाठी अदानींना टार्गेट करण्यात आले, मोदी-अदानींना टार्गेट करण्यासाठी महुआ सतत राहुल गांधींच्या संपर्कात होत्या. त्याचबरोबर सुचेता दलाल, शार्दुल श्रॉफ, पल्लवी श्रॉफ, शशी थरूर आणि पिनाकी मिश्रा हेही मदत करत होते. त्याचबरोबर महुआ यांनी या कामात परदेशी पत्रकारांना सोबत घेतले. हे पत्रकार एफटी, एनवायटी आणि बीबीसीचे होते. त्याचबरोबर महुआ अनेक भारतीय मीडिया हाऊसच्या संपर्कातही होत्या. महुआ यांना पाठिंबा दिल्याने मला विरोधी राज्यांमध्ये मदत होईल अशी आशा होती. अस दर्शन हिरानंदानी यांनी म्हटलं आहे.

Mahua Moitra : कोण आहे दर्शन हिरानंदानी?

दर्शन हिरानंदानी हा देशातील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट व्यावसायिकांपैकी एक असलेले निरंजन हिरानंदानी यांचा मुलगा आहे. तो लवकरच हिरानंदानी ग्रुपचा सीईओ बनणार आहे. ऊर्जा, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांतही हिरानंदानी समूहाचा सहभाग आहे. हिरानंदानी समूह आणि अदानी समूह यांच्यात वाद कायम आहे.  हिरानंदानी ग्रुपने इन्फ्रा आणि एनर्जी कॉन्ट्रॅक्टसाठी बोली लावली होती, जी शेवटी अदानी ग्रुपकडे गेली. याशिवाय हिरानंदानी समूहाने २०१४ साली धामरा बंदरासाठी बोली लावली होती, तर अदानी समुहालाही हे कंत्राट मिळाले होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT