Latest

महाविकास आघाडी सरकार धोक्यात, मुख्यमंत्र्यांनी बोलावली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाच्या धर्तीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक आज (दि.२२) बोलावली आहे. दुपारी एक वाजता होणाऱ्या या बैठकीत काय निर्णय होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अख्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या आमदारांना घेऊन सुरतला पोहोचहलेले शिंदे आज पहाटे विशेष विमानाने ४० आमदारांसह गुवाहाटीला पोहोचले आहेत.

महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाच्या धर्तीवर दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करून ४० आमदारांना घेऊन सुरतला गेले होते. आज (दि.२२) रोजी हे सर्व आमदार विशेष विमानाने गुवाहाटीला दाखल झाले. गुवाहाटी विमानतळाबाहेर त्‍यांच्यासाठीखास तीन बसेस तयार ठेवण्यात आल्या होत्या. तेथून ते रॅडिसन हॅाटेलकडे रवाना झाले आहेत. सध्या या सर्व आमदारांना रॅडिसन हॉटेलमध्ये सुरक्षीत ठेवण्यात आले आहे.

यावेळी गुवाहाटी विमानतळावर दाखल होताच माध्यमांच्या प्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांना गराडा घातला. तुमच्यासोबत किती आमदार आहेत असा सवाल उपस्‍थित आहेत असा सवाल विचारला असता, शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार आपल्‍या सोबत असल्याचा दावा त्‍यांनी केला आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना बाळासाहेबांचं हिंदूत्व पुढे घेऊन जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अजुनही १० आमदार आपल्‍यासोबत येतील असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. यामुळे आणखी १० आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील होणार असल्‍याचं दिसून येत आहे.

SCROLL FOR NEXT