Latest

महती नवदुर्गांची : श्रीगजेंद्रलक्ष्मीदेवी (श्रीगजांबिका)

स्वालिया न. शिकलगार

नवदुर्गांतील अष्टदुर्गादेवी म्हणजेच श्री गजेंद्रलक्ष्मीदेवी (श्रीगजांबिका) होय. जुना बुधवार पेठ परिसरातील तोरस्कर चौक, ब्रह्मपुरी येथील चर्चसमोर देवीचे मंदिर आहे. काळ्या पाषाणाची तीन फूट उंचीची देवीची बैठी मूर्ती आहे. हनुमंत, महादेव या परिवार देवता देवळा शेजारीच आहेत.

दैव-दैत्यांच्या समुद्र मंथनातून प्राप्त झालेले महालक्ष्मी हे प्रथम दिव्यरत्न. कमळावर बसलेल्या अत्यंत सुंदर, पवित्र व मनोहर अशा महालक्ष्मी मातेस प्रथम अष्टदिग्गजांनी आपल्या सोंडेत सुवर्णकलश घेऊन त्यातील अमृतजलाने महामस्तकाभिषेक केला. या जगदंबेच्यापूजनीय स्वरुपास श्री 'गजेंद्रलक्ष्मी' असे म्हणतात. ऐश्वर्याच्या परमावधीचे प्रतीक म्हणून या देवीची उपासना करतात. कोल्हापुरातील हे स्थान अत्यंत प्रासादिक व जागृत आहे. (संदर्भ : श्री नवदुर्गायात्रा मार्गदर्शन)

SCROLL FOR NEXT