Latest

महती नवदुर्गांची : श्री अनुगामिनीदेवी (श्री अनुगांबिका)

स्वालिया न. शिकलगार

नवदुर्गांतील सप्तदुर्गा देवी म्हणजेच श्री अनुगामिनीदेवी (श्री अनुगांबिका) होय. रंकाळा टॉवर परिसरातील राजर्षी शाहूकालीन धुण्याच्या चावीजवळील शेतवडीत देवीचे मंदिर आहे. सहा हातांची, पायाखाली राक्षस असलेली ५ फुटांची भव्य मूर्ती मंदिरात आहे. म्हसोबा, श्रीपादुका, महादेव आदी परिवार देवता आहेत.

अनुगामिनीदेवी कोल्हापूरची रक्षक देवता आहे. क्षेत्राचे संकटापासून ती रक्षण करते. करवीरवासी योद्ध्याच्या मृत्यूनंतर त्याला यमाची पीडा होऊ नये म्हणून त्या मृतात्म्याच्या मागून जाते व जगदंबेच्या पायी मुक्ती देते. संजीवनी नदी व मयुरी नद्यांच्या दिव्य संगमावरील रमणीय व प्रासादिक स्थानावरील ही देवता आहे. संजीवनी व मयुरी नद्यांचे स्मरण करून यथाविधी देवीचे दर्शन घेऊन आरती – स्तोत्र म्हणून परिवाराचे दर्शन घ्यावे, असे यात्रेचे स्वरूप आहे. (संदर्भ : श्री नवदुर्गायात्रा मार्गदर्शन)

SCROLL FOR NEXT