Latest

महाराष्ट्राची हास्यजत्रा – आता चार दिवस पाहता येणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम ओळखला जातो. टेन्शनवरची मात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमानी रसिकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा मंच रसिकांना निखळ आनंद देत असून हास्यजत्रेतील एकेक व्यक्तिरेखा रसिकांना त्यांच्या घरातली वाटते. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील सगळेच कलाकार आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भरभरून हसवतात. टेन्शन विसरण्यासाठी, दुःख दूर करण्यासाठी आणि मनमुराद हसण्यासाठी भाग पडतात. प्रेक्षकांसाठी एक गोड बातमी अशी आहे की, आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम चार दिवस पाहता येणार आहे. म्हणजेच आता ४ वार प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन होणार आहे.

आता नवनवीन प्रहसनांतून काही वेगळेपण अनुभवायला मिळणार आहे आणि यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. निवेदिका प्राजक्ता माळी हिची उत्स्फूर्त दाद, हास्यरसिक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांचं मार्मिक परीक्षण तर समीर, गौरव, नम्रता, प्रसाद, चेतना, शिवाली, पृथ्वीक, ओंकार, दत्तू आणि इतर कलाकार यांचे दमदार अभिनय यांमुळे निखळ मनोरंजन होतं.'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- चार वार, हास्याचा चौकार! सोमवार ते गुरुवार रात्री ९ वा सोनी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.

SCROLL FOR NEXT