Latest

37th National Games : वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या कोमल वाकळेला सुवर्णपदक

backup backup

पणजी; विठ्ठल गावडे पारवाडकर : कांपाल पणजी येथील क्रीडा नगरीत आज (दि. २८) झालेल्या 87 वजनी गटाच्या महिलांच्या वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या कोमल वाकळे हिने एकूण 205 किलो वजन उचलून सुवर्णपदक प्राप्त केले.

कर्नाटकाच्या बी. एन. उषा हिने 203 किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवले तर हरियानाची राखी हिने 196 किलो वजन उचलून कांस्य पदक पटकावले. कर्नाटकांची वेटलिफ्टिंग खेळाडू उषा एस आर हिला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. या गटात गोव्याची वेटलिफ्टर तनुजा कुकळकर हिने बराच संघर्ष केला मात्र तिला पदक प्राप्त करणे शक्य झाले नाही.

SCROLL FOR NEXT