Latest

Prison Department Recruitment : कारागृह विभागात २५५ पदांसाठी भरती

मोहन कारंडे

नोकरीच्या संधी : जॉर्ज क्रूझ 

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागांतर्गत लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी तसेच तांत्रिक संवर्गातील (गट-क) एकूण – 255 पदे भरावयाची आहेत. 21 जानेवारी 2024 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे. अधिक माहितीसाठी http://www.mahaprisons.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.

भरावयाची पदे व अर्हता :

लिपिक – 125 पदे –

मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण.

वरिष्ठ लिपिक – 31 पदे –

मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण.

लघुलेखक निम्नश्रेणी – 4 पदे –

SSC किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण तसेच शॉर्टहॅण्ड उत्तीर्ण स्पीड 100 प्रति शब्द मि. व टाईपरायटिंग उत्तीर्ण.
मराठी/इंग्रजी – 40 प्रति शब्द मि.

मिश्रक – 27 पदे –

SSC/HSC किंवा तत्सम व औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंजीकृत औषध व्यावसायिक म्हणून Bombay State Pharmacy Council ला नावनोंदणी आवश्यक. अनुभव असल्यास प्राधान्य. (B.Farm/D.Farm).

शिक्षक – 12 पदे –

SSC/HSC किंवा तत्सम व शिक्षण पदविका उत्तीर्ण.
प्रौढ शिक्षणवर्ग चालविण्याचा पूर्वानुभव असल्यास प्राधान्य.

शिवणकाम निदेशक –

10 पदे – SSC/ महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर टेलर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग फर्ममध्ये दोन वर्षांचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.

सुतारकाम निदेशक – 10 पदे – SSC/ महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभागाचे अथवा समतुल्य सुतारकाम प्रमाणपत्र, तसेच सुतारकाम व्यवसायातील दोन वर्षांचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव प्रमाणपत्र.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 8 पदे –

भौतिक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इंटरमिजिएट परीक्षा अथवा HSC उत्तीर्ण आणि शासनमान्य प्रयोगशाळा तंत्राचे 1 वर्षाचे प्रशिक्षण उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र.

बेकरी निदेशक – 4 पदे –

SSC/ महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभागाचे अथवा समतुल्य बेकरीमध्ये आणि कन्फेक्शनरीमध्ये क्राप्ट मॅनाशीपचे प्रमाणपत्र, तसेच बेकरी उद्योगामध्ये लागणार्‍या कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यासाठी सक्षम असलेबाबत व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षांचा अनुभव आवश्यक.

ताणाकार – 6 पदे –

SSC/HSC व महाराष्ट्र तंत्रशिक्षण विभागाचे अथवा समतुल्य ताणाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या वापिंग मशिनवर, सूत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा दोन वर्षांचा अनुभव आवश्यक.

विणकाम निदेशक – 2 पदे –

शासनमान्य संस्थेमधून विणकाम टेक्नॉलॉजीचे प्रमाणपत्र, तसेच दोन वर्षांचा प्रत्यक्ष कामाचा व व्यावहारिक अनुभव आवश्यक.

चर्मकला निदेशक – 2 पदे –

SSC/ महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फूटवेअर निर्मितीचे प्रमाणपत्र चर्मकला उद्योगासाठी आवश्यक. कच्चा मालाचा हिशेब ठेवकास सक्षम असणे व प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षांचा अनुभव.

तंत्रनिदेशक -2 पदे –

SSC/ महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे तांत्रिक चरलहळपळीीं प्रमाणपत्र व प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षांचा अनुभव आवश्यक.
तसेच मिटिंग अ‍ॅण्ड विव्हिंग निर्देशक, करवत्या, लोहारकाम, कातारी, गृह पर्यवेक्षक, पंजा व गालीचा निदेशक, ब्रेललिपी निदेशक, जोडारी, प्रिप्रेटरी, मिलिंग पर्यवेक्षक, शारीरिक कवायत निदेशक व शारीरिक शिक्षण निदेशक या पदांचाही समावेश आहे.
पात्रता – भारतीय नागरिकत्व, वयोमर्यादा – 1 जानेवारी 2024 पर्यंत खुला वर्ग 38 वर्षे तर मागासवर्गीय उमेदवारासाठी 43 वर्षे. परीक्षा फी खुला – 1000 रु., राखीव – 900 रु. परीक्षेचे स्वरूप – लिपिक पदासाठी व वरिष्ठ लिपिक पदासाठी ः मराठी 25 प्रश्न, इंग्रजी 25 प्रश्न, सामान्य ज्ञान 25 प्रश्न, बौद्धिक चाचणी व अंकगणित-25 प्रश्न. एकूण – 100 प्रश्न 200 गुण. वेळ 2 तास.

लघुलेखक नि. श्रेणी व इतर पदांसाठी ः

मराठी – प्रश्न 15, इंग्रजी प्रश्न 15, सामान्यज्ञान प्रश्न – 15 बौद्धिक चाचणी व अंकगणित – प्रश्न – 15, एकूण 60 प्रश्न, 120 गुण.
व्यावसायिक चाचणी – 40 मिनिटे
परीक्षा कालावधी – 80 मिनिटे
एकूण गुणाच्या किमान 45% मिळविणे आवश्यक आहे.

संदर्भ ः

मराठी बाळासाहेब शिंदे,
English – एम. जे. शेख.
गणित व बुद्धीमापन वसे.
सामान्यज्ञान-ल्युसेन्ट मुनेकर आतापर्यंत झालेले TCS व IBPS चे पेपर सोडवा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT