Latest

Maharashtra Politics : शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत कुठेही जाणार नाही : बच्चू कडू

सोनाली जाधव

नागपूर पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्या भेटीची राजकिय वर्तुळात चर्चा असताना मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आहेत, तोवर मी कोठेही जाणार नसल्याची प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि आमदार कडू यांच्यात बंदद्वार चर्चा झाली. (Maharashtra Politics)

शरद पवार हे सध्या अमरावतीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आमदार बच्चू कडू यांनी शरद पवारांना घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. आज शरद पवार यांनी वझ्झर येथील शंकर बाबा पापडकर यांच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर बच्चू कडू यांच्या निवासस्थानी पूर्णा येथे जाऊन त्यांची भेट घेतली.या भेटीत थोडी सामाजिक व थोडी राजकीय चर्चा झाल्याचे कडू यांनी सांगितले. पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे ही रोजगार हमी योजनेत व्हायला हवेत. ही बाब तुमच्या अजेंड्यामध्ये असायला हवी, असे मी त्यांना सुचवले, आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही. मात्र, समजा जर ती झाली असेल तरी तुम्हाला सांगायचे काही कारण नाही. बऱ्याच गोष्टी उघड करायच्या नसतात. शिंदे साहेब जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. अजून आकाशात ढगच आले नाही, ढग आल्यावर बघू, असेही संकेत त्यांनी दिले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT