Latest

Maharashtra Politics : घर अबाधित न ठेवणाऱ्यांनी घराणेशाहीची व्याख्या सांगावी : मुख्यमंत्री शिंदे

सोनाली जाधव

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : स्वतःचे घर अबाधित ठेवू शकले नाहीत, घरातील सगळ्यांना घराबाहेर काढले. सवंगड्यांना नोकर, घरगडी समजतात, अशांची अनेक वर्षांची साचलेली घाण ही आम्ही स्वच्छ करत असल्याचा जोरदार प्रतिहल्ला उद्धव ठाकरे यांच्या घराणेशाहीच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केला.

राज्यातील सर्व मंदिरे आणि परिसर स्वच्छ केला जाणार आहे. सर्वंकष स्वच्छता अभियानांचे लोकसहभागातून लोकचळवळीत रूपांतर व्हावे. विरोधी पक्षांनीही स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केले.राज्यातील सर्व मंदिरांची स्वच्छता करा, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री शिंदे यांनी मंदिराच्या साफसफाईची सुरुवात ठाण्यातील प्राचीन कौपिनेश्वर मंदिरापासून केली. त्यांनी स्वतः मंदिर परिसरात झाडलोट केली. नंतर मुख्य सभामंडप व परिसराची पाण्याने साफसफाई केली. त्यावेळी ते मध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीवर केलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, त्यांनी दौरा करावा, स्वच्छता मोहीमही हाती घेतली पाहिजे. आम्ही अनेक वर्षांची साचलेली घाण ही स्वच्छ करीत असून त्यांनी घराणेशाहीची व्याख्या सांगावी. राम मंदिर उभारणीची चेष्टा करणारे ठाकरे यांचे राम प्रेम बेगडी आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

SCROLL FOR NEXT