Latest

Maharashtra Politics : वाघ नखे टोचतात आणि पेंग्विन…; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

Sonali Jadhav

पुढारी ऑनलाईन डेस्क : लंडनच्या संग्रहालयातील छत्रपती शिवरायांची वाघनखं पुढच्या तीन वर्षांसाठी राज्य शासन भारतात आणत आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे रविवारी १ ऑक्टोबर रोजी लंडनला रवाना झाले आहेत. परंतु या वाघनखांवरून सध्या राज्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावरुन विरोधी पक्षातून सरकारला धारेवर धरले आहे. आदित्य ठाकरे यांनी "ही वाघनखे शिवकालीन आहेत की, छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत" याचा सरकारने खुलासा करावा म्हटलं आहे. यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण. (Maharashtra Politics)

संबधित बातम्या

Maharashtra Politics : अफझलखान तुमचा कोण?

आदित्य ठाकरे यांनी," छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे सामान्य जनतेला पाहता यावीत, यासाठी महाराष्ट्रास तीन वर्षांसाठी देण्यास व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमने मान्य केले आहे. ही वाघनखे शिवकालीन आहेत की, छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत याचा सरकारने खुलासा करावा. अशी मागणी केली होती. त्यानंतर आशिष शेलार यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत त्याला उत्तर दिले आहे,

"छत्रपतींंच्या वंशजांकडे पुरावे मागणारे आता वाघ नखांचेही पुरावे मागू लागले? आम्हाला शिवकालीन जे जे सापडेल ते ते सारे प्रिय छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती सुद्धा आम्हास वंदनीय. इथे हळूहळू हळूहळू औरंगजेबी वृत्ती मात्र डोकं वर काढतेय? महाराजांच्या पराक्रमाचेच इथे पुरावे मागतेय? आदू बाळाने शाळेतील पुस्तक सोडून अन्य काही वाचलेय का? यांना वाघ नख टोचतात आणि पेंग्विन घेऊन हे गावभर नाचतात? अहो, पब मधला थरथराट बाहेर असा कोण करतो का? अफझलखान तुमचा कोण पाहुणा लागतो का?

'बाळ' हा शब्द लावावाच लागला : आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परदेश दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले होते. अशिष शेलार यांनी 'आदू बाळा' असा उल्लेख करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता. याला प्रतिउत्तर देत आदित्य ठाकरे यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर लिहिलं होतं की, "कितीही प्रयत्न करा, माझ्या नावात तुम्हाला 'बाळ' हा शब्द लावावाच लागला. ते माझ्या रक्तातच आहे आणि म्हणूनच जनतेचे आशीर्वाद माझ्या सोबत आहेत! अभिमान आहे! एका 'आदू बाळा'साठी तुमचा एवढा राग आणि तुमची ही भाषाच तुमच्या मनात बसलेली भीती आणि तुमच्या घरातले संस्कार ह्या बद्दल फार काही बोलून जाते!"

हेही वाचा

SCROLL FOR NEXT