Latest

Maharashtra political crisis : सर्वोच्च न्यायालयाच्‍या निर्णयावर पूर्णपणे समाधानी : देवेंद्र फडणवीस

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : महाराष्‍ट्राच्‍या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णयावर आम्ही पूर्णपणे समाधानी आहे. या निर्णयाने  लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. (Maharashtra political crisis)

देशासह महाराष्‍ट्राचे लक्ष लागून राहिलेल्‍या महाराष्‍ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाला आज (दि.११)  लागला. सर्वोच्‍च न्‍यायालयाने एकनाथ शिंदेसह १६ आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली.

लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय

यावेळी फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या संदर्भात जो निकाल दिला आहे त्याबाबत आम्ही पुर्णपणे समाधान व्यक  करतो. आणि  या निर्णयाने निश्चितपणे लोकशाहीचा आणि   लोकमताचा विजय झाला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने फडणवीस यांनी काही मुद्दे सांगितले त्यामध्ये त्यांनी सांगितले की, सर्वात पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या मनसुभ्यावर पाणी फेरले  गेलं. उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून बोलवता येणार नाही अस सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय देण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे.

एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा : उद्धव ठाकरे 

आजपासून लढाईला खरी सुरूवात झाली आहे. मी दिलेला राजीनामा कायदेशीररित्या चुकीचा असू शकतो पण नैतिकतेचा विचार केला तर पक्षाने आणि माझ्या वडिलांनी सर्व काही देवूनही जर माझ्याकडे बोट करत असतील, विश्वास घात करणारे माझ्यावर अविश्वास आणत असतील तर हे मला पटणार नव्हतं म्हणून मी राजीनामा दिला. नैतिकता असेल तर मी राजीनामा दिला तसा एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, असे ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटले आहे.  यावर बोलत असताना फडणवीस म्हणाले,

मी उद्धव ठेकरेंची पत्रकार परिषद सहसाकरुन पाहत नाही पण यावेळी पाहिली,  तुम्ही लाज आणि भितीपोटी  राजीनामा दिला. एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.  भाजपला दगा दिला आणि कॉंग्रेस सोबत सत्ता स्थापन केली. तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती. शिंदेनी विचारांसाठी खुर्ची सोडली आणि तुम्ही खुर्चीसाठी विचार सोडले. तर तुम्ही आम्हाला नैतिकता सांगु नका म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT