Latest

Maharashtra political crisis : मविआत जागा वाटपावरून ठिणगी; ठाकरे गटाचा १९ जागांवर दावा काँग्रेस, राष्ट्रवादीची नाराजी

सोनाली जाधव

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागा वाटपाच्या चर्चेला तोंड फुटताच वादालाही सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी याआधी जिंकलेल्या १९ जागांवर दावा केला. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने नार- जी व्यक्त करीत आघाडीत अडचण निर्माण होईल अशी वक्तव्ये करणे राळण्याचा सल्ला राऊत यांना दिला. (Maharashtra political crisis )

कर्नाटकातील सत्तांतराने उत्साह संचारलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झाली. त्या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपाची बोलणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची समिती नेमली जाणार आहे. मात्र, त्याआधीच शिव- सेनेने लोकसभेच्या १९ मतदारसंघांवर दावा सांगितला. संजय राऊत म्हणाले, लोकसभेत आमचे १९ खासदार असतील. गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने ४ तर काँग्रेसने १ जागा जिंकली आहे. या जागा त्यांच्याकडेच राहतील. जिंकल्यानंतर कोण कुठे गेला यावर जागावाटप ठरणार नाही. महाराष्ट्रात आम्ही १८ जागा जिंकल्या होत्या आणि दादरा नगर हवेलीचा एक खासदार आमचा आहे. असे एकूण १९ खासदार आमचे असतील.

राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. मविआतील तीन पक्षांत प्रत्येकी १६ जागा वाटल्या जाव्यात अशी प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. मात्र, राऊत यांनी हा फॉर्म्युला फेटाळून लावला आहे. असा कोणताही फॉर्म्युला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Maharashtra political crisis : मविआत जागा वाटपावरून ठिणगी

जिंकलेल्या जागा व्यतिरिक्त आणखी काही जागांवर दावा करणार असल्याचे संकेतही राऊत यांनी दिले. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीत जागा वाटपाचा अद्याप कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. त्यावर चर्चाही झालेली नाही. या प्रकरणी तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची ९ सदस्यीय समिती स्थापन करून निर्णय घेतला जाईल, असे पटोले यांनी स्पष्ट केले. अशी विधाने करून महाविकास आघाडी आखत असलेल्या रणनीतीमध्ये अडचणी निर्माण करू नये, असेही पटोले यांनी राऊत यांना सुनावले…

Maharashtra political crisis : शरद पवारांचा इशारा महत्वाचा ठरणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी २०२४ ला राहील की नाही हे सांगता येत नाही असे वक्तव्य केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसची ईच्छा आघाडी राहावी अशीच आहे.. मविआचे भवितव्य पण, हे जागा वाटपावरून अवलंबून असल्याचा इशाराही त्यांनी • दिला होता. त्यामुळे माविआ साठी जागावाटपावर यशस्वी तोडगा काढण महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT