Latest

राज्यात आज ओमायक्रॉनचे ७ रुग्ण वाढले, तीन वर्षीय चिमुरड्याला सुद्धा लागण

backup backup

मुंबई; पुढारी ऑनलाईन

महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे 7 नवीन रुग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये 3 मुंबईतील तर 4 पिंपरी चिंचवडमधील आहेत. त्याचवेळी, महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यातील ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या 17 वर गेली आहे. मुंबईतील धारावीमध्येही एकाला ओमायक्रॉनची लागण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धारावीतील एक रहिवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता, ज्यानंतर त्या व्यक्तीमध्ये कोरोनाचे नवीन प्रकार ओमायक्रॉनची पुष्टी झाली. हा रहिवासी नुकताच टांझानियाहून परतला होता. मिळालेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 32 केसेस झाल्या आहेत.

आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकार, ओमायक्रॉनच्या नवीनतम स्थितीवर पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये देशातील परिस्थिती सांगितली गेली. पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, ओमायक्रॉन आतापर्यंत एकूण 59 देशांमध्ये पसरला आहे.

याआधी गुरुवारी रात्री उशिरा कोलकाता विमानतळावर एका आंतरराष्ट्रीय प्रवाशाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली. हा प्रवासी 18 वर्षीय महिला असून ती दोहा येथून QR 540 या फ्लाईटने आली होती. राज्य सरकारच्या कोविड प्रोटोकॉल मार्गदर्शक तत्त्वांनुसार संभाव्य ओमायक्रॉन स्ट्रेनच्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना पुढील चाचणीसाठी बेलेघाटा आयडी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

जयपूरमधून दिलासादायक बातमी

त्याचवेळी राजस्थानच्या जयपूरमधून एक दिलासादायक बातमी आली आहे. येथे ओमायक्रॉनची लागण झालेल्या सर्व 9 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. हे सर्व लोक दक्षिण आफ्रिकेतून आले असून ते एकाच कुटुंबातील आहेत. दुसरीकडे, गुरुवारी ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराने संक्रमित आणखी 249 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. यूकेमध्ये एका दिवसात ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. ब्रिटनमध्ये अशी एकूण ८१७ प्रकरणे समोर आली आहेत.

SCROLL FOR NEXT