Latest

ड्रग्ज प्रकरणी सरकार ॲक्शनमोडवर, औषध दुकानांमध्ये आता सीसीटीव्ही

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ड्रग्ज प्रकरणी सरकार ॲक्शनमोडवर आहे. कफ सिरपचा गैरवापर होत असून त्यासाठी औषध दुकानांना प्रिस्क्रिप्शन आणि औषधांच्या साठ्याची माहिती द्यावी लागणार आहे. तसेच औषध दुकानात सीसीसीटीव्ही लावावे लागतील, अशी माहिती आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा-सुव्यवस्थेविषयी महत्त्वाची माहिती दिली. महाराष्ट्रात गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाल्याची माहिती देत त्यांनी गुन्ह्यांची आकडेवारी सांगितली. विरोधकांच्या तीन प्रस्तावांवर फडणवीसांनी उत्तर दिलं. त्यावेळी ते बोलत होते. शिवाय, महत्त्वाच्या मुद्द्यांवर फडणवीसांनी माहिती दिलीय. महिला आणि बाल सुरक्षा, ड्रग्ज आणि औषधांसंबंधी महत्वाची माहिती फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

फडणवीस म्हणाले, ड्रग्ज प्रकरणी सरकार ॲक्शनमोडवर आहे. औषध दुकानांमध्ये सीसीटीव्ही बसवले आहेत. काही कफ सिरपचा गैरवापर होताना दिसतोय. प्रिस्क्रिप्सन आणि औषधांच्या साठ्याची माहिती द्यावी लागणार आहे. औषध कंपन्या ट्रॅकिंग सिस्टीमवर असणार आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, फडणवीस म्हणाले की, गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. महिलांना नेहमीच मुंबई सुरक्षित वाटते. कुठलंही शहर सुरक्षित असणं महत्त्वाचं आहे. महिला आणि बालके हे जेव्हा गायब होतात, त्यावर काही निर्बंध येतात. दर लाख लोकसंख्येमागे महाराष्ट्रात २९४ गुन्हे घडतात. गुन्ह्यांच्या यादीत महाराष्ट्र १० व्या क्रमांकावर आहे. महिला, बालकांच्या अत्याचारामध्ये महाराष्ट्र १२ व्या क्रमांकावर आहे.

बेपत्ता महिलांबदद्लही महत्त्वाची माहिती फडणवीसांनी दिली. फडणवीस म्हणाले, महिला अपरणांचे प्रमाण जास्त आहे. बाल लैंगिक गुन्ह्यामंध्य महाराष्ट्र १७ व्या क्रमांकावर आहे. २०२२ मध्ये बेपत्ता झालेल्या ८० टक्के महिला सापडल्या आहेत.

जे अंमली पदार्थ सापडतात, ते नष्ट करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारकडून संयुक्त कारवाई सुरु असून अंमली पदार्थाच्या विक्रिवरही शासनाचे लक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले.

SCROLL FOR NEXT