Latest

HSC Board Exam 2024 : बारावीची परीक्षा आजपासून

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बुधवार (दि. 21) पासून बारावीची लेखी परीक्षा सुरू होत आहे. कोल्हापूर विभागातून सुमारे एक लाख 19 हजार 642 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कोल्हापूर बोर्डाकडून परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. (HSC Board Exam 2024)

बारावीची कोल्हापूर विभागात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात 175 परीक्षा केंद्रे आहेत. गोपनीय साहित्य, प्रश्नपत्रिका परिरक्षकांच्या ताब्यात दिलेल्या आहेत. ज्या त्या दिवशी परिरक्षक रनरच्या मदतीने संबंधित परीक्षा केंद्रावर परीक्षेपूर्वी एक तास अगोदर प्रश्नपत्रिका पोहोचवतील. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर हेल्पलाईन, समुपदेशक व भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. कस्टोडियन, केंद्रप्रमुखांची बैठक घेऊन परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती कोल्हापूर बोर्डाचे सचिव सुभाष चौगुले यांनी दिली. (HSC Board Exam 2024)

SCROLL FOR NEXT