Latest

सुट्टीच्या हंगामात ‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’ रद्द

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सलग सुट्ट्यांमुळे प्रवाशांची गर्दी असतानाच महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या चार फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापुरातून सुटणारी शनिवार (दि. 12) व सोमवारी (दि. 14), तर गोंदियातून सोमवार, दि. 14 आणि बुधवार, दि. 16 रोजी सुटणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस रद्द केल्याने प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत.

भुसावळ विभागातील जळगाव-भुसावळ दरम्यान तिसर्‍या रेल्वे मार्गाचे तसेच यार्ड पुनर्दुरुस्तीचे तांत्रिक काम केले जाणार आहे. याकरिता या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. त्याचा परिणाम या मार्गावरून धावणार्‍या अनेक गाड्यांवर झाला आहे. परिणामी महाराष्ट्र एक्स्प्रेसच्या जाणार्‍या दोन व येणार्‍या दोन अशा चार फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत.

राज्यातील सर्वाधिक लांब पल्ल्याची असणार्‍या या गाडीला प्रवाशांची मोठी मागणी असते. त्यातच सध्या सलग सुट्ट्या जोडून आल्याने गाडीला मोठी गर्दी होती. आगाऊ आरक्षण केलेल्यांचे गाडी रद्द झाल्याने मोठे हाल होणार आहेत. तिकिटाचे पैसे परत मिळणार असले तरी सुट्ट्यांच्या कालावधीत केलेले नियोजन पूर्णपणे कोलमडून जाणार आहे. खासगी बसेसचे तिकीट वाढवण्यात आले आहे. त्यातच आता रेल्वे रद्द झाल्याचा परिणाम त्यावर होणार असून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT