Latest

Maharashtra Assembly | विधानसभेत बीबीसी डॉक्युमेंट्री विरोधात ठराव मंजूर, विरोधकांचा सभात्याग

दीपक दि. भांदिगरे

मुंबई; पुढारी ऑनलाईन : विधानसभेत (Maharashtra Assembly) आज शनिवारी २००२ च्या गुजरात दंगलीवरील डॉक्युमेंट्री प्रकरणी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) चा निषेध करण्यात आला. बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून देशाच्या न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याचा आणि धार्मिक फूट निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या बीबीसी डॉक्युमेंट्री विरोधातील ठराव भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मांडला. या ठरावाद्वारे डॉक्युमेंट्री प्रकरणी बीबीसीचा निषेध करत म्हटले की त्यांनी धार्मिक फूट निर्माण करण्याचा आणि भारताच्या न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. सभागृहाने आवाजी मतदानाने हा ठराव मंजूर केला. यावेळी विरोधक सभागृहात उपस्थित नव्हते.

विधीमंडळाच्या आवारात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पोस्टरला पादत्राणे लावणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत अध्यक्षांनी निर्णय घेण्यात दिरंगाई केल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. यामुळे बीबीसी डॉक्युमेंट्री विरोधातील ज्यावेळी ठराव मंजूर झाला त्यावेळी विरोधक सभागृहात उपस्थित नव्हते. (Maharashtra Assembly)

गुजरात दंगलीवर आधारीत बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीमुळे देशभरात वादंग निर्माण झाले होते. त्यानंतर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने आपत्कालीन अधिकारांचा वापर करीत त्यावर बंदी घातली होती. 'इंडिया : द मोदी क्वेश्चन' (India : The Modi Question) या डॉक्यूमेंट्रीतून पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात बीबीसीने अनेक दावे केले आहेत. सोशल मीडिया तसेच ऑनलाईन चॅनल प्लॅटफॉर्मवर या डॉक्युमेंट्रीच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली आहे. डॉक्युमेंट्रीसंबंधीत सोशल मीडियावरील लिंक देखील ब्लॉक करण्यात आली आहे.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT