Latest

Mahalakshmi Express : महालक्ष्मी एक्स्प्रेस ‘एलएचबी कोच’सह धावणार

दिनेश चोरगे

मिरज; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर – मुंबई – कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस आता आयसीएफऐवजी एलएचबी कोचसह धावणार आहे. 26 जानेवारीपासून हे कोच जोडण्यात येणार आहेत. याबाबत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मध्य रेल्वेला सूचना दिल्या आहेत.
धनबाद-कोल्हापूर आणि नागपूर-कोल्हापूर या एक्स्प्रेस कोल्हापूरमध्ये आल्यानंतर तब्बल 36 तास थांबून राहतात. या गाड्या येथे थांबवून ठेवण्याऐवजी कोल्हापूर-हैदराबाद आणि कोल्हापूर-वडोदरा धावतील, असे मंत्री दानवे यांनी सांगितले. त्यामुळे या गाड्या लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर-मुंबई वंदेभारत एक्स्प्रेस नियोजनात

कोल्हापूर-मुंबई वंदेभारत एक्स्प्रेस तातडीने सुरू करावी, अशी मागणी मिरज रेल्वे कृती समितीकडून करण्यात आली. त्यावर दानवे यांनी याबाबत नियोजन सुरू असल्याचे सांगितले.

मिरज रेल्वे कृती समितीच्या मागण्या

मिरजेत पीटलाईनचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे गाड्यांची संख्या वाढवावी
सांगलीत सर्व गाड्यांना थांबा देण्यात यावा
सकाळी सोलापूरसाठी मिरजेतून एक नवीन रेल्वे सोडावी
कोयना एक्स्प्रेसला दोन अतिरिक्त सीटिंग कोच जोडण्यात यावे
मिरज-परळी या डेमूऐवजी एक्स्प्रेस सोडावी
मिरज हे मॉडेल रेल्वेस्थानकात समाविष्ट केल्याने त्याचे काम लवकर सुरू करावे

SCROLL FOR NEXT