Latest

Drunk driving : मद्यधूंद अवस्थेत तिघांना उडवले , आराेपीला जामीन मंजूर करताना न्‍यायालयाने दिला ‘हा’ आदेश

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दोन आठवडे चेन्‍नईतील एल. बी. रोड जंक्‍शन येथे सुरक्षित वाहन चालविण्‍याच्‍या नियमांविषयी आणि  ड्रंकन ड्रायव्हिंग विरुद्ध पॅम्प्लेट वाटप करा, असा आदेश दारू पिऊन कार चालवल्‍या प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर करताना मद्रास उच्‍च न्‍यायालयाने दिला आहे. ( Drunk driving )

Drunk driving : जामीनासाठी आरोपीची उच्‍च न्‍यायालयात धाव

दीपन याला २३ ऑगस्‍ट २०२२ रोजी मद्यधूंद अवस्थेत गाडी चालवून तीन जणांना जखमी केल्‍याप्रकरणी अटक केली होती. त्‍याने जामीनासाठी उच्‍च न्‍यायालयात अर्ज दाखल केला. त्‍याच्‍या वकिलांनी युक्‍तीवाद करताना सांगितले की, दीपन हा २३ ऑगस्‍टपासून कोठडीत आहे. अपघातातील जखमींवर रुग्‍णालयात उपचार झाले आहेत. दीपन याच्‍यावर कुटुंबाची जबाबदारी असल्‍याने त्‍याला जामीन मिळावा, अशी विनंतीही त्‍याने केली. दीपनच्‍या याचिकेला विरोध करणार्‍या वकिलांनी युक्‍तीवाद केला की, दीपन हा घटनेच्‍या रात्री मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता.त्‍याने तीन जणांना जखमी केले तसेच तो घटनास्‍थळावरुन पळून गेला होता.

'ड्रंकन ड्रायव्हिंग' विरुद्धची पॅम्प्लेट वितरित करा

दोन्‍ही युक्‍तीवादानंतर न्यायमूर्ती एडी जगदीश चंडीरा यांनी आरोपीला जामीन देताना न्‍यायमूर्तींनी स्‍पष्‍ट केले की, संशयित आरोपी पुढील दोन आठवडे पोलिसांसमोर दररोज सकाळी 9.00 आणि संध्याकाळी 5.00 वाजता अहवाल देइल. तसेच दररोज सकाळी ९ ते १० आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत एलबी रोड जंक्शन, चेन्नई येथे सुरक्षित वाहन चालवणे आणि 'ड्रंकन ड्रायव्हिंग' विरुद्धची पॅम्प्लेट वितरित करावेत. दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार पोलिसांसमोर अहवाल देण्‍यात यावा, असेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट करत २५ हजार रुपयांच्‍या जातमुचकल्यावर आरोपी दीपन याला जामीन मंजूर केला.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT