Latest

मध्‍य प्रदेशमध्‍ये काँग्रेसला धक्‍का, माजी केंद्रीय मंत्री पचौरींसह १२ जणांचा भाजपमध्‍ये प्रवेश

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार सुरेश पचौरी यांच्‍यासह १२ हून अधिक काँग्रेस नेत्यांनी आज (दि.९ मार्च) भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्‍ये इंदूरचे संजय शुक्ला आणि विशाल पटेल यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे. या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी मध्‍ये प्रदेश भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष अध्यक्ष व्हीडी शर्मा, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि मंत्री कैलाश विजयवर्गीय यांची प्रमुख्‍य उपस्‍थिती होती.

काँग्रेसचे मोठे नुकसान

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांने लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्‍ये प्रवेश केल्‍याने पक्षाचे मोठे नुकसान होईल, अशी चर्चा आहे. संजय शुक्‍ला आणि विशाल पटेल हे इंदूरमधील काँग्रेसच्या लोकप्रिय नेत्यांपैकी एक होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांचा पराभव करून त्यांनी विजय मिळवला होता. कमलनाथ सरकारमध्ये हे दोन्ही नेते खूप लोकप्रिय होते. काँग्रेसचे आमदार असताना संजय शुक्ला यांनी इंदूर विधानसभा मतदारसंघासाठी मोठा निधी उपलब्‍ध केला होता. विशाल पटेल यांनीही देपालपूरमध्ये आपला विशेष प्रभाव निर्माण केला होता.

भाजपमध्‍ये प्रवेश केलेले नेते

सुरेश पचौरी, संजय शुक्ला, विशाल पटेल, गजेंद्रसिंग राजू खेडी, अर्जुन पालिया, आलोक चांसोरिया, कैलास मिश्रा, योगेश शर्मा, अतुल शर्मा, सुभाष यादव, दिनेश ढिमोळे, सुभाष यादव यांनी आज भाजपमध्‍ये प्रवेश केला आहे.

पचौरी हे मध्य प्रदेशातील काँग्रेसचे राजकीय संत

यावेळी मध्‍य प्रदेश भाजपचे प्रदेशामध्‍ये शर्मा म्‍हणाले की, सुरेश पचौरी यांच्यासारख्या संतांना काँग्रेसमध्ये स्थान नाही.पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशात चांगले काम होत आहे. जनता भाजपवर विश्वास व्यक्त करत आहे. सुरेश पचौरी हे मध्य प्रदेशातील काँग्रेसचे राजकीय संत आहेत.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरेश पचौरी म्हणाले, " समाज आणि देशाची सेवा करण्यासाठी मी राजकारणात प्रवेश केला होता. काँग्रेसने वर्गहीन समाज स्थापन करायला हवा होता, पण आज तो विचार पूर्णपणे बाजूला पडला आहे,"

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT