Latest

Madhuri Dixit : माधुरीने कुटुंबासह सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, फॅन्सची उसळली गर्दी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : माधुरी दीक्षितचा निर्माती म्हणून माधुरी दुसरा चित्रपट 'पंचक' आता प्रदर्शित होत आहे. त्या पार्श्वभूमीवर तिने मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. (Madhuri Dixit ) यावेळी ती पती डॉ. श्रीराम नेने तसेच दोन्ही मुलं अरिन व रेयानसह आली होती.  (Madhuri Dixit )

मंदिराबाहेर मीडियाशी बोलताना तिने सांगितले, मी इथे बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी आलेय. माझा चित्रपट 'पंचक' रीलिज होत आहे. मी लोकांना हा चित्रपट पाहण्याचा आग्रह करते. हा चित्रपट मराठीत असला तरी सर्व भाषिक प्रेक्षक तो पाहू शकतील, कारण यामध्ये सबटायटल्सही दिलेले आहेत. माधुरीच्या 'पंचक' मध्ये आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर व अन्य अनेक कलाकार आहेत. हा चित्रपट ५ जानेवारीला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होईल.

SCROLL FOR NEXT