Latest

ग्रीन कॉरिडॉरच्या साहाय्याने दात्याजवळ ‘वायूवेगाने’ पोहोचलं फुफ्फुस

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

एका व्यक्तीला जीवदान देण्यासाठी पुणे विमानतळावरून हैदराबाद येथे तातडीने ग्रीन कॉरिडॉरद्वारे फुफ्फुस पोहोचविण्यात आले. यासाठी शुक्रवारी सकाळी 6 वाजताच पुणे विमानतळावर मोठी धावपळ उडाली होती. विमानतळावरील सर्व यंत्रणांनी एकत्र येत मोठी मदत केली.

पहाटेच्या सुमारास हैदराबाद येथे एका रुग्णाला अचानक फुफ्फुसाची आवश्यकता भासली आणि सर्व यंत्रणांना हायअलर्ट आला. राज्यभरात या अवयवाची शोधाशोध सुरू झाली. यावेळी पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात फुफ्फुस उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. सकाळी 6 च्या सुमारास वाहतूक पोलिसांच्या मदतीने हा अवयव पुणे विमानतळावर आणण्यात आला.

पहाटे पुण्यातील रस्त्यांवर वाहतूक कमी होती. मात्र, विमानाची कोंडी आधीच झालेली होती. त्या कोंडीतून हैदराबादला अवयव वेळेत पोहोचविणे महत्त्वाचे होते. हा अवयव हैदराबाद येथील क्रिश्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, सिकंदराबाद येथे पोहचविण्यात आला.

केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांची मदत
पुणे विमानतळ प्रशासनाने विमानतळावर होणार्‍या गर्दीतून हा अवयव तत्काळ आत घेण्यासाठी केंद्रीय सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) जवानांची मदत घेतली. या जवानांनी हा अवयव मोठ्या शिताफीने सुरक्षा गेटवरून प्रवाशांच्या गर्दीतून विमानापर्यंत पोहोचविला. याकरिता काही काळ प्रवाशांना थांबवून ठेवावे लागले.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT