Latest

LPG Price Cut : निवडणुकीपूर्वी दिलासा… एलपीजी सिलिंडर स्वस्त झाला, पहा नवे दर

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन : आजपासून (1 एप्रिल ) नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असून, त्याच्या पहिल्याच दिवशी गॅसच्या दरात LPG Price Cut मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे एप्रिलमध्ये तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. मात्र, व्यावसायिक गॅस सिलिंडरवर ही कपात करण्यात आली आहे. 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 32 रुपयांनी स्वस्त झाला आहे. आजपासून नवे दर लागू झाले आहेत.

तेल विपणन कंपन्यांनी नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ एप्रिल २०२४ रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. ताज्या किमतीत कपात केल्यानंतर आता राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 30.50 रुपयांनी कमी होऊन 1764.50 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 32 रुपयांनी कमी झाली असून आता तो येथे 1879 रुपयांना मिळणार आहे. मुंबईबद्दल बोलायचे झाले तर येथे एका सिलिंडरची किंमत 31.50 रुपयांनी कमी होऊन 1717.50 रुपये इतकी झाली आहे, तर चेन्नईमध्ये 30.50 रुपयांनी कमी होऊन 1930 रुपये झाली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT