Latest

घरगुती सिलिंडर ४०० रुपये, १५ लाखांचा आरोग्‍य विमा : तेलंगणामध्‍ये ‘बीसीआर’च्या जाहीरनाम्‍यात घाेषणांचा पाऊस

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तेलंगणा राज्‍यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. आज (दि.१५ ) तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्‍या भारत राष्ट्र समिती पक्षाचा (बीसीआर) जाहीरनामा प्रसिद्ध करण्‍यात आला. भारत राष्ट्र समिती पक्षाने ऑगस्टमध्येच एकूण ११९ विधानसभेच्या जागांपैकी ११५ जागांसाठी उमेदवार जाहीर केले होते.  तेलंगणा विधानसभेची निवडणूक ३० नोव्हेंबरला होणार असून निकाल ३ डिसेंबरला लागणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्र समितीचा (BRS) जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. के चंद्रशेखर राव यांनी जाहीरनाम्‍याच्‍या माध्‍यामातून दलित बंधू अंतर्गत, तेलंगणातील प्रत्येक दलित कुटुंबाला व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 10 लाख रुपयांचे अनुदान देण्‍याची ग्‍वाही दिली आहे. तसेच. KCR विमा योजना राज्यातील 93 लाख BPL कुटुंबांना 5 लाख रुपयांचा विमा प्रदान करणार असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे. .

ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि अपंगांसाठी सामाजिक पेन्शन पुढील काही वर्षांत टप्प्याटप्प्याने 2,016 रुपयांवरून 5,000 रुपये प्रति महिना केली जाईल. दिव्यांगांसाठी सामाजिक सुरक्षा पेन्शन दरमहा 6,000 रुपये करण्यात येणार आहे. तसेच सर्व पात्र कुटुंबांना 400 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासनही देण्‍यात आले आहे. सर्व पात्र मतदारांसाठी 15 लाख रुपयांचे आरोग्य कवच देण्‍याची ग्‍वाहीही त्‍यांनी दिली आहे.

प्रत्येकासाठी घर मिळणे ही कोणत्याही सरकारची सामाजिक जबाबदारी आहे, असा दावा करत तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी हैदराबादमध्ये आणखी एक लाख डबल-बेड खोल्या बांधण्याची घोषणा केली आहे. केसीआर रविवारी संध्याकाळी सिद्धीपेट जिल्ह्यातील हुस्नाबाद येथे प्रचार सभेला संबोधित करणार आहेत. हुस्नाबाद हा के. चंदशखेर राव यांच्‍यासाठी भाग्यवान मतदारसंघ मानला जातो, 2018 च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी त्याच ठिकाणाहून प्रचार सुरू केला होता.


हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT