Latest

काश्मिरी नागरिक ३२ वर्षांनी थिएटरमध्ये : दहशत झुगारत पाहिला ‘विक्रम वेधा’ – Cinema hall reopens in Kashmir

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन : काश्मिरमध्ये ३२ वर्षांनंतर थिएटर सुरू झाले आहेत. शनिवारी विक्रम वेधाचा शो आयनॉक्सच्या श्रीनगर येथील थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला. काश्मिरी नागरिकांनी ३२ वर्षांत प्रथमच थिएटरमध्ये जाऊन सिनेमाचा अनुभव घेतला. (Cinema hall reopens in Kashmir)

श्रीनगरमधील शिवपोरा परिसरात हे सिनेमागृह सुरू झाले आहे. येथील व्यावसायिक विजय धर यांनी हे थिएटर सुरू केले आहे.
१९९०मध्ये दहशतवाद्यांनी काश्मीरमधील सर्व सिनेमागृहे बंद केली होती. त्या वेळी काश्मीरमध्ये १२च्या आसपास थिएटर होते. पण दहशतवाद्यांनी थिएटरना इस्लामविरोधी ठरवत, त्यावर बंदी घातली होती. १९९९ला सरकारने काश्मीरमधील थिएटर पुन्हा सुरू कऱण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात यश आले नव्हते.

२० सप्टेंबरला नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते या थिएटरचे उद्घाटन करण्यात झाले. सिन्हा यांनी १८ सप्टेंबरला शोफियन आणि पुलवामा या दोन ठिकाणी थिएटरचे उद्घाटन केले होते. २० सप्टेंबरला उद्घाटनाच्या निमित्ताने लाल सिंग चढ्ढाचा शो आयोजित करण्यात आला होता.

विजय धर काश्मीरमध्ये दिल्ली पब्लिक स्कूलही चालवतात. त्यांनी काश्मीरच्या नागरिकांसाठी हे अत्याधुनिक थिएटर सुरू केले आहे. विजय धर यांचे पुत्र विकास या थिएटरचे व्यवस्थापन पाहातात. ते म्हणाले, "आमच्या थिएटरमध्ये ३ स्क्रीन आहेत. सध्या दोन स्क्रीनवर सिनेमा दाखवण्यात येत आहे. काश्मीरचे नागरिक आणि सिनेमा यांच्यात वेगळे नाते आहे. गेल्या काही वर्षांत यात खंड पडला होता. पण आता हे नाते नव्‍याने सुरू होईल."

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT