पुढारी ऑनलाईन डेस्क : बीदर, धारवाड, कोडागू, रायचूर, दावणगेरेसह कर्नाटकातील ४८ ठिकाणी लोकायुक्तांनी आज (दि.१७) छापे टाकले. बिदरमधील पोलीस हवालदार विजया कुमार यांच्या घरावर लोकायुक्तांनी छापे टाकले. तसेच बेळगाव महामंडळाचे सहाय्यक आयुक्त संतोष अनिशेत्तर यांच्या सप्तपूर येथील निवासस्थानावर देखील लोकायुक्तांनी छापा टाकाला आहे. २०० अधिकाऱ्यांच्या पथकाकडून ही छापेमारी सुरू आहे.