Latest

…. ‘तो’पर्यंत सभागृहात येणार नाही : लोकसभा अध्‍यक्षांचा निर्णय, जाणून घ्‍या कारण

नंदू लटके

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे बरेचसे कामकाज गदारोळात वाहून गेले आहे.  या पार्श्वभूमीवर लोकसभेचे अध्यक्ष ( Lok Sabha Speaker )ओम बिर्ला ( Om Birla ) हे सत्ताधारी आणि विरोधी खासदारांकडून घातल्या जात असलेल्या गोंधळावर नाराज झाले आहेत. जोवर खासदारांचे वर्तन सुधारणार नाही, तोवर लोकसभेत न येण्याचा निर्णय बिर्ला यांनी घेतला आहे.

लोकसभा अध्‍यक्षांच्‍या दिशेने भिरकावले होते कागदाचे तुकडे

लोकसभेत मंगळवारी दिल्लीसंदर्भातले विधेयक मांडतेवेळी विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला होता. त्यावेळी काही विरोधी खासदारांनी 'वेल' मध्ये येऊन बिर्ला यांच्या दिशेने कागदाचे तुकडे फेकले होते. यावर बिर्ला यांनी नाराजी व्यक्त करीत जोवर खासदारांचे वर्तन सुधारणार नाही, तोवर आपण सदनात येणार नाही, असे सांगितले होते. त्यानुसार बुधवारीही ते सदनात आले नाहीत. खासदार जर सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवू देत नसतील तर आपण लोकसभेत येणार नाही, असा पवित्रा बिर्ला यांनी घेतला आहे.

मणिपूरच्या मुद्यावरुन गदारोळ कायम

दरम्यान, मणिपूरच्या मुद्यावरुन चर्चा घेण्याच्या मागणीसाठी विरोधी सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचे आज ( दि. २ ) कामकाज पूर्णपणे वाया गेले. सकाळच्या सत्रात पीठासीन अधिकाऱ्यांना प्रश्नोत्तर तसेच शून्य प्रहराचे कामकाज गुंडाळावे लागले तर दुपारच्या सत्रात अवघ्या काही मिनिटांत पीठासीन अधिकारी किरीट सोळंखी यांनी कामकाज गुरुवारपर्यंत तहकूब केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT