Latest

Lok Sabha Elections 2024 : पीएम नरेंद्र मोदींच्या हस्ते भाजपच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Lok Sabha Elections 2024 : भारतीय जनता पक्षाने (भाजप) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीसाठी 'संकल्प पत्र' नावाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपने जाहीरनाम्यात जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत.

पीएम मोदींनी भाजप मुख्यालयात 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे संकल्प पत्र जारी केले. यात तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब या चार घटकांना सामोरे ठेवले आहे. या चार घटकांच्या उन्नतीसाठी अनेक उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचा पंतप्रधान मोदींचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात रोडमॅप सादर केला आहे.

भाजपच्या मुख्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर गृहमंत्री अमित शहा, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होते.

लोकसभा निवडणूक 2024 साठी पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी देशात 19 आणि 26 एप्रिल, 7, 13, 20 आणि 25 मे आणि 1 जून रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात देशातील विविध घटकांच्या विकासावर भर दिला आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही गेल्या ५ वर्षात सशक्त भारताचा संकल्प पूर्ण करण्याचे काम यशस्वीपणे केले आहे. आता आम्ही भारतातील 140 कोटी नागरिकांसमोर आमचा नवा जाहीरनामा मांडला आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही गेल्या ५ वर्षात सशक्त भारताचा संकल्प पूर्ण करण्याचे काम यशस्वीपणे केले आहे. आता आम्ही भारतातील 140 कोटी नागरिकांसमोर आमचा नवा जाहीरनामा मांडला आहे.

SCROLL FOR NEXT