Latest

Lok Sabha Elections 2024: भोजपुरी गायक पवन सिंह यांची लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा; ‘आईला दिलेलं वचन…’

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: भाजपने 2 मार्च रोजी भोजपुरी गायक पवन सिंह यांना तिकीट देण्याची घोषणा केली होती. पक्षाने त्यांना पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांनी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानत काही कारणास्तव मी निवडणूक लढवू शकणार नसल्याचे म्हटले होते. परंतु आता पुन्हा एकदा पवन सिंह यांनी लोकसभा निवडणुक लढणार असल्याची घोषणा केली आहे. या संदर्भातील पोस्ट त्यांनी एक्स अकाऊंटवरून केली आहे. (Lok Sabha Elections 2024)

पवन सिंह यांनी X पोस्टमध्ये म्हटले आहे की, " मी माझा समाज, जनतेला, आणि आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी निवडणूक लढवणार आहे. यासाठी आपले आशीर्वाद व सहकार्य अपेक्षित आहे. जय माता दी…!" (Lok Sabha Elections 2024)

भाजपने पवन सिंह यांना दिले आसनसोलमधून तिकीट

भाजपने 2 मार्च रोजी पवन सिंह यांना तिकीट देण्याची घोषणा केली होती. पक्षाने त्यांना पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात आवाज उठल्यानंतर त्यांनी उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली. यासोबतच त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उमेदवारी का मागे घेतली याचा खुलासा केला नाही. परंतु आज पुन्हा एकदा सोशल मीडिया एक्स अकाऊंटवरून निवडणुक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (Lok Sabha Elections 2024)

हे ही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT